अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढत कारगिल युद्ध जिंकलेल्या जवानांना विनम्र अभिवादन !

कारगिल युद्धात भारताच्या ५२७ जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन विजय मिळवला. तो दिवस होता २६ जुलै १९९९ आजही हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांची अभिमानाने मन उंचावतो. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढत कारगिल युद्ध जिंकलेल्या जवानांना विनम्र अभिवादन !

१९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता.

समुद्र सपाटीपासून १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला होता. या युद्धात भारतीय सैन्याचे ५०० हून अधिक जवान शाहिद झाले, एकहजाराहू जखमी झाले. ऑपरेशन विजय’ची जबाबदारी जवळपास दोन लाख जवानांच्या खांद्यावर होती.

या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मू-काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ शीख रेजिमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)