पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे आणि पुणेकर यांच्यात कायमच एक वेगेळे नाते आहे. वसंत मोरेंनी पुणेकरांसाठी कोरोनाकाळात केलेल्या कामामुळे त्यांनी नागरिकांची मनं जिंकून घेतली आहेत.आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांनी त्यांच्या एका कृतीमुळे सर्वांची मनं जिंकून घेतली.
वसंत मोरे यांनी एक ट्वीट करत मंगळवारी मध्यरात्री घडलेला प्रकार सांगितला. मोरे नेहमीप्रमाणे रात्री उशिरा कात्रज-कोंढवा राजस चौकात पीएमपीएमएलची एक बस त्यांना लाईट लागलेल्या अवस्थेत उभी असलेली दिसली. गाडीचा वाहक बसभोवती फिरत होता, तर चालक बसमध्येच बसून होता. मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली म्हणून वसंत मोरे यांनी चालकाकडे विचारणा केली. या गाडीत ती एकमेव महिला प्रवासी होती.पावणेबारा वाजण्याच्या सुमारास गाडी कात्रज येथे आली. या महिलबरोबर बाळ आणि सामानाच्या दोन-तीन पिशव्या होत्या.
वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज – कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक @PMPMLPune ची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता.
१/५ pic.twitter.com/mqiCUshNPx— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 15, 2022
महिलेचे नातेवाईक तिला घ्यायला येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र पंधरा-वीस मिनिटे झाली तरी कोणी आले नाही. त्यामुळे गाडीतील दिवे सुरू ठेवून महिलेला गाडीत बसविले आणि आम्ही तिच्या नातेवाईकांची वाट पहात बसलो…’ पीएमपीचे कंडक्टर नागनाथ ननवरे सांगत होते.
पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बस च्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला! त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. त्या दोघांची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर! @PMPMLPune
४/५— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) June 15, 2022
बसमध्ये एकटी महिला आणि बाकी सगळे पुरुष होते. त्यामुळे बसचे चालक आणि वाहक पहिल्यापासूनच सावध होते. त्या महिलेला नेण्यासाठी कुणीच येईना म्हणून त्यांनी महिलेच्या नातेवाईकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र भ्रमणध्वनी लागत नव्हता. माजी नगरसेवक वसंत मोरे तेथे आल्यानंतर त्यांनी सुरक्षितपणे महिलेला त्यांच्या मोटारीतून घरी सुखरूप सोडले.