Salary Hike – विविध उद्योगांमधील भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारात यावर्षी सरासरी 9.4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात कमाल पगारवाढ 10 टक्क्यांपर्यंत असू शकते. मानवी संसाधन सल्लागार कंपनी मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे.
सर्वेक्षणानुसार गेल्या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांच्या पगारात सातत्याने वाढ झाली आहे. सरासरी वेतन वाढ 2025 मध्ये 9.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक वाहनांची सतत वाढणारी संख्या आणि सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्र पुढे जाईल. 2024 मध्ये ऑटोमोबाईल उद्योगात 8.8 टक्के पगारवाढ झाली होती. उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सरासरी पगारवाढ आठ टक्क्यांवरून 9.7टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
37 टक्के कंपन्यांचा कर्मचारी संख्या वाढवण्याचा विचार –
सर्वेक्षणात म्हटले आहे की 37 टक्के कंपन्या 2025 मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहेत. नोकरी सोडण्याचा दर 11.9 टक्के स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. नोकरी सोडण्याचा दर कृषी आणि रासायनिक क्षेत्रांमध्ये 13.6 टक्के आणि सामायिक सेवा संस्थांमध्ये 13 टक्के पर्यंत पोहोचू शकतो.