आलियाच्या “गंगूबाई काठियावाडी’मध्ये हुमा कुरेशीचा स्पेशल रोल

संजय लिला भन्साळीचा “गंगूबाई काठियावाडी’चा पसारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या सिनेमात एक-एक करत नवीन कलाकार सहभागी व्हायला लागले आहेत. दोनच दिवसांपूर्वी “पद्मावत’मधील जिम सरभ हा “गंगूबाई…’मध्ये असणार आहे, असे समजले होते. या सिनेमात जिम सरभ एका पत्रकाराच्या रोलमध्ये असणार आहे. आता आणखी एका नवीन ऍक्‍टरची भर या प्रोजेक्‍टमध्ये झाली आहे. हुमा कुरेशी या सिनेमात एका विशेष रोलमध्ये दिसणार आहे.

सिनेमातील अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर तिची एन्ट्री होणार आहे. या छोट्या रोलसाठीचे शूटिंग हुमा कुरेशी आता सुरू करते आहे. “गंगूबाई…’मधील एका कव्वाली गाण्यात हुमा दिसणार आहे. त्यासाठी खास सेट देखील उभारला गेला आहे.

या कव्वालीचे शूटिंग 5 दिवस चालणार आहे. हुमाच्या या स्पेशल रोलबद्दल स्वतः हुमा कुरेशी आणि संजय लिला भन्साळीही खूपच उत्सुक आहे. मात्र या कव्वालीमध्ये हुमा कुरेशीबरोबर स्वतः आलियादेखील असणार आहे की नाही, हे समजू शकलेले नाही. “गंगूबाई…’चे शूटिंग जानेवारीपर्यंत संपेल, असा आलियाचा अंदाज आहे. या सिनेमात आलिया मुंबईतील अंडरवर्ल्डच्या डॉन लेडीचा रोल करते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.