‘हम दिल दे चुके सनम’ला 22 वर्ष पूर्ण झाल्याने सलमानकडून आठवणींना उजाळा; ऐश्वर्याचं नाव न घेतल्याने नेटकऱ्यांनी घेतली शाळा…

मुंबई – बॉलिवूड मधील हिट चित्रपटांच्या यादीत आवर्जुन नाव घेतलं जाणारा चित्रपट म्हणजे “हम दिल दे चुके सनम”. हा चित्रपट 1999 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांची उत्तम केमिस्ट्री या चित्रपटात दाखविण्यात आली. त्यामुळे आजही हा चित्रपटात अनेकांच्या आवडीचा चित्रपट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दमदार संवाद, डोळे दिपवणारे भव्य दिव्य सेट आणि मंत्र मुग्ध करणारे संगीत यामुळे या चित्रपटाला चार-चांद लागले. नुकतंच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनेता सलमान खानने सोशलवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सलमानने या फोटोसोबत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अजय देवगण यांना टॅग केले आहे. पण त्याने या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री ‘ऐश्वर्या राय बच्चन’ला टॅग करणे टाळले आहे. मात्र, नेटिझन्सच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी सलमानला कमेंटद्वारे प्रश्न विचारत शाळा घेतली आहे.

दरम्यान, ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात ऐश्वर्या आणि सलमान व्यतिरिक्त अजय देवगण, विक्रम गोखले, झोरा सेहगल, हेलन, स्मिता जयकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते.  प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरश: उचलून धरलं होतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.