हॉंगकॉंग हिंसाचारात आंदोलकांकडून पेट्रोल बॉम्बचा सर्रास वापर

हॉंगकॉंग:  हॉंगकॉंगमध्ये नव्याने सुरू झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांकडून पेट्रोल बॉम्बचा सर्रास वापर व्हायला लागला आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या परिसरात आज या आंडोलनाला सुरूवात झाली. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला. त्या बदल्यात कार्यकर्त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकले, काहींनी परिसरा बाहेरील झाडे पेटविली.

रस्त्यावरची वाहतुक रोखण्यासाठी ठिकठिकाणी अडथळे उभे करण्यात आले होते. वाहतुक सुरळीतपणे सुरू व्हावी, यासाठी चीनचे पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) सैनिक रस्त्यांवर उतरले होते. पीपल्स रिपब्लिकचे सैनिक क्‍वचितच अशाप्रकारे रस्त्यावर उतरत असतात. त्यामुळे त्यांच्या रस्त्यारवर येण्यानंतर लगेचच विद्यापिठ परिसरात हिंसाचार उसळला. रात्रभर आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. त्यानंतर आंदोलक विद्यापिठाच्या आवारात एकत्र जमा झाले होते.

हॉंगकॉंगने “पीएलए’कडून मदत मागितली नव्हती. पण की सैन्याने स्वेच्छेने ही कारवाई सुरू केली. असे हॉंगकॉंग शहराच्या सरकारी प्रवक्त्‌याने सांगितले. तथापि, लोकशाही समर्थक खासदारांनी “पीएलए’च्या कृतीचा निषेध केला असून, सैन्याने सरकारकडून विचारल्याखेरीज स्थानिक कार्यात हस्तक्षेप करू नये, असा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.