Sanya Malhotra | अभिनेत्री सान्या मल्होत्राचा ‘मिसेस’ चित्रपट सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मिसेस’ हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सान्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. एका गृहिणीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
सान्याने प्रेक्षकांचे मानले आभार
सान्याने तिच्या चित्रपटातील एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिले, “माझे हृदय भरुन आले आहे. ज्यांनी ‘मिसेस’ हा चित्रपट पाहिला, ऋचा या भूमिकेला प्रेम दिलं, त्या सर्वांनाच अगदी मनापासून धन्यवाद.” सान्याने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सान्या ही हात जोडून उभी असताना दिसत आहे आणि त्याखाली ‘250M वॉच टाइम’ असे लिहिले आहे. सान्याने हे पोस्टर शेअर करताना प्रेक्षकांचे आभार मानले.
View this post on Instagram
‘मिसेस’ हा ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. आरती कडव यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिसेस’ चित्रपटात सान्या मल्होत्राने उत्तम भूमिका निभावली आहे. ‘मिसेस’ या चित्रपटात निशांत दहिया, कंवलजीत सिंग, अपर्णा घोषाल यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले.
‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम भाषेतील चित्रपटात निमिषा सजयन ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच 2023 मध्ये ‘द ग्रेट इंडियन किचन’चा तमिळ भाषेत देखील रिमेक बनवला होता. Sanya Malhotra |
हेही वाचा: