शिरूरमध्ये बीटस्तरीय कला, क्रीडा महोत्सवास प्रतिसाद

आलेगाव पागा येथील विद्यालयात विजेत्या विद्यालयांसह विद्यार्थ्यांचा गौरव

मांडवगण फराटा – शिरूर तालुक्‍यातील आलेगाव पागा येथील श्री. भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात यशवंतराव चव्हाण कला क्रिडा महोत्सव बीट स्तरावरील स्पर्धेस प्रतिसाद मिळाला. केंद्रप्रमुख दगडू वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली धावणे, चेंडू फेक, गोळाफेक, उंचउडी, लांब उडी, वक्‍तृत्व, थाळीफेक तर सांघिक स्पर्धेमधे कबड्डी, खो-खो, लेझीम, भजन, लोकनृत्य स्पधेंचे आयोजन केले होते.

शिरूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके म्हणाले की, जीवनात मुलांनी अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष केंद्रित केले पाहिजे. भविष्यात खेळ आणि खेळाडू यांना फार चांगले दिवस आहेत. ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होतात. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा भोसले तर प्रमुख पाहुणे छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके, विस्तार अधिकारी एल. डी. काळे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे उपस्थित होते. पारितोषीक वितरण सोहळा गट शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्या हस्ते पार पडला. उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्राचार्य तुकाराम बेनके व केंद्रप्रमुख दगडू वेताळ यांचे आभार मानले.

विषय तज्ज्ञ प्रदीप देवकाते, केंद्रप्रमुख शंकर लोखंडे, शिक्षण समिती जिल्हाध्यक्ष शरद निंबाळकर, संभाजी सोसायटीचे उपाध्यक्ष तुकाराम मोरे, संभाजी कुटे, प्रा. संतोष शेळके, शिवाजी वाघचौरे, शिरूर शिक्षक समितीचे अध्यक्ष सतीश नागवडे, शिक्षक नेते दादासाहेब शेलार, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सतीश पाचर्णे, रामदास वाघचौरे, पांडुरंग वेताळ, जोगा जांभळकर, कैलास पाचर्णे, बीट स्तरावरील केंद्रप्रमुख, क्रिडा प्रशिक्षक, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गोरक्षनाथ डुबे यांनी केले. व्यवस्थापन सुनील म्हाळसकर यांनी केले.

निकाल पुढीलप्रमाणे – गोळाफेक (मुले)- प्रथम- संतोष सुरासे (सादलगाव), व्दितीय- कुणाल खेडकर (शिंदोडी), तृतीय- सिद्धार्थ वाल्मिक पठारे (रांजणगाव सांडस). गोळाफेक (मुली)- मयुरी सुपेकर (शिरसगाव), मोनिका खिलारे (कुरूळी), पायल जांबळे (आंबळे), चेंडुफेक (मुले)- सोहम बळभार (निमोणे),निरंजन देव (न्हावरे), यश थोरात (घाडगेमळा). चेंडूफेक (मुली)- साक्षी आनुसे (शिंदोडी), लक्ष्मी महती (पिंपळसुट्टी), शिवानी नागवडे (खंडागळेवस्ती), वक्‍तृत्व स्पर्धा (मोठा गट)- दिव्या श. पवार (सादलगाव), सोनाली इंगळे (शिरसगाव काटा), मयुरी फुलफगर (आंबळे). वक्‍तृत्व स्पर्धा (लहान गट)- गायत्री गोरे (शिरसगाव काटा),अथर्व भागवत कारखेले (मांडवगण फराटा), अनुष्का चौधरी (न्हावरे). उंच उडी (लहान गट मुले)- सुधीर भोसले (गणेगाव), आथर्व शितोळे (शिरसगाव काटा),

सोहम संजय बळभार (निमोणे), उंच उडी (लहान गट)- साक्षी आनुसे (शिंदोडी), प्रतीक्षा ढवळे (कुरूळी), प्रतिभा निवास साठे (नागरगाव). लांबउडी (लहान गट मुले)-सुधीर भोसले (तांदळी), सोहम बळकाल (निमोणे), अनुराज ज्ञानेश्‍वर फराटे . लांब उडी (लहान गट मुली)- दीपाली बेंद्रे (आंबळे), साक्षी आनोसे (निर्वी), सृष्टी विकास गायकवाड (वडगाव). थाळी फेक (मुले)- संतोष सुरासे (सादलगाव), शिवम डुबे (शिरसगाव),

कार्तिक साळुंके (निमोणे), थाळीफेक (मुली)धनश्री काळे, क्षितीजा गायकवाड (सादलगाव), साक्षी आनुसे (शिंदोडी), कब्बडी (मुले सांघीक)- शिंदोडी, रांजणगाव सांडस. कबड्डी (मुली)- सादलगाव, आंबळे, खो-खो (मुले)- सादलगाव, खो-खो (मुली)- सादलगाव, शिरसगाव काटा, लेझीम (मोठा गट)- गुनाट- लहान गट (मुली)- चिंचणी. लोकनृत्य (लहान गट)- आलेगाव पागा, शिरसगाव काटा, न्हावरे. लोकनृत्य (मोठा गट)- शिरसगाव काटा, भजनस्पर्धा-रांजणगाव सांडस. 100 मीटर धावणे- सुनील सोनवणे (शिंदोडी),

संतोष नामदेव सुरासे (सादलगाव), गणेश बळकार (निमोणे). 100 मीटर धावणे- प्रियंका दलशिंगारे (आंबळे), आकांक्षा भाऊसाहेब ढवळे (कुरुळी), सपना अडसुरे (गुनाट). 50 मीटर धावणे (मुले)- रवींद्र गायकवाड (चिंचणी), साहिल जाधव (शिंदे वस्ती), आर्यन बेंद्रे (आंबळे). 50 मीटर धावणे (मुली)- दिव्या सोनवणे (सादलगाव),अर्चना निकम (न्हावरे), पूजा बर्डे (भैरवनाथ नगर). लांब उडी (मोठा गट)- सपना अडसुरे, हनुमंत गायकवाड,वैष्णवी लाड (निमोणे). उंच उडी (मोठा गट मुले)- संतोष सुरासे (सादलगाव), सुनील सोनवणे (शिंदोडी), केतन डुके(निमोणे).उंचउडी(मोठा गट)- प्रियंका दलशिंगारे (आंबळे), अनुष्का शिंदे (सादलगाव), सपना भा.अडसुरे (गुनाट).

Leave A Reply

Your email address will not be published.