क्रिकेटपटू मोहम्मद शमीला न्यायालयाचा दिलासा, अटक वॉरंटला स्थगिती

कोलकता – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याला पश्चिम बंगालच्या जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी जारी केलेल्या अटक वॉरंटला अलीपूर जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीनाने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

मागील आठवड्यात कोर्टाने शमी आणि त्याचा भाऊ अहमदविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. कोर्टाने दिलेल्या आदेशात मोहम्मद शमीला १५ दिवसांच्य आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. शमीचे वकील सलीम रहमान यांनी सांगितले की, अलीपूर जिल्ह्य न्यायाधिश राज चट्टोपाध्याय यांनी शमीच्या वॉरंटला स्थगिती दिली. या खटल्याची पुढील सुनावणी आता २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)