नवी दिल्ली – करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्याचा उद्योग व्यवसायावर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे सोने आणि चांदीमधील गुंतवणूक कालपासून वाढू लागली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत. परिणामी भारतीय बाजारात सोने-चांदीचे दर वाढले.
दिल्ली सराफात सोन्याचे दर 337 रुपयांनी वाढून 46,372 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा भाव 1,149 रुपयांनी वाढून 69,667 रुपये प्रत्येकी किलो या पातळीवर केला. जागतीक बाजारात सान्याचे दर 1,808 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 28.08 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले.
सोन्याच्या या वाढलेल्या दराबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, रात्री अमेरिका आणि युरोपमधील आकडेवारी उपलब्ध झाली. यामध्ये सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे दिसून आहे. भारत आपल्या गरजेचे बहुतांश सोने आयात करीत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यानंतर त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढतात.
वाढत असलेल्या करोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत आहेत. त्याचबरोबर सोन्यासह इतर कमोडिटीजकडे गुंतवणूक वळत असल्याचे पटेल यांनी सांगितले.
आता सोने 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. आगामी काळात सोन्याचे दर कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करणाऱ्यासाठी व्यवहार फायदेशीर राहील, असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.