Chennai Air Force Show | भारतीय वायूसेनेच्या 92 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त चेन्नईमध्ये एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रविवारी मरीना बीचवर लाखो लोक जमले होते. मात्र उष्णतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर 230 पेक्षा अधिक नागरिकांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यात पेरुंगलथूरचे 48 वर्षीय श्रीनिवास, तिरुवोट्टियूरचे 34 वर्षीय कार्तिकेयन आणि कोरुकुपेटचे 56 वर्षीय जॉन यांचा मृत्यू झाला आहे. चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या एअर शोमध्ये लढाऊ विमानांचे थरारक प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासूनच प्रेक्षकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मरीना बीचवर चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती तयार झाली होती. नागरिक ऐवढ्या मोठ्या प्रमाणात एयर शो पाहण्यासाठी जमले होते की बीचवर पाय ठेवण्यासाठी देखील जागा नव्हती.
#WATCH | Chennai, Tamil Nadu | A woman seen being evacuated from a huge rush at the Mega Air Show on Marina Beach ahead of the 92nd Indian Air Force Day.
There are reports of attendees fainting, rushed to the hospital due to heavy crowd presence and heat. pic.twitter.com/SgNEhuTnUH
— ANI (@ANI) October 6, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मरीना बीच येथे एअर शो 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत चालू होता. यासाठी सकाळी 8 वाजेपासून नागरीक कार्यक्रमस्थळी आले होते. Chennai Air Force Show |
मात्र मरीना बीचवर सकाळपासूनच ऊन असल्याने नागरीक बेशुद्ध झाले. तर शो संपताच मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडण्यासाठी जमा झाले, यामुळे तेथील वाहतूकही ठप्प झाली होती. या कारणामुळे रुग्णवाहिका गर्दीत अडकल्याने मदत लवकर मिळणे कठीण झाले होते.
पाणी विक्रेत्यांना परिसरातून हटवले
गर्दीमुळे आजूबाजूच्या पाणी विक्रेत्यांना परिसरातून हटवण्याच आलं होतं. या कारणामुळे तिथे उपस्थित असलेल्या लाखो नागरिकांना त्यामुळे पाणी मिळालं नाही. मात्र अनेकांना त्रास होऊ लागल्यानंतर समुद्र किनाऱ्यावर राहणारी अनेक नागरीक मदतीसाठी पुढे आले. त्यांनी नागरिकांना पाणी देऊन मदत केली. Chennai Air Force Show |
दरम्यान, लाइट हाऊस आणि चेन्नई बंदर दरम्यान मरीना येथे आयोजित ९२ व्या एयर फोर्स दिना निमित्त एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, चेन्नईच्या महापौर आर. प्रिया आणि इतर अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा:
कराची विमानतळाजवळ भीषण स्फोट ; स्फोटात 2 ठार तर जण गंभीर 10 जखमी