पुणे – दिवाळीची सुट्टी आज संपल्यानंतर नागरिकांची गावावरून पुन्हा घरी परतण्याची लगबग सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रेल्वे गाड्या, बसेस, खासगी प्रवासी वाहने या सर्वच ठिकाणी आज गर्दी पहायला मिळत आहे. आज पुणे रेल्वेस्थानकावरील सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रत्येक बोगीमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली. परिणामी, प्रवाशांना बोगीत चढण्याकरता जागाच मिळत नाही.
दरम्यान, गर्दीची ही परिस्थिती आज राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. प्रगती एक्सप्रेस आणि नांदेड-पनवेल एक्सप्रेस या दोन गाड्या रद्द केल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच सुट्टीच्या कालावधीमध्ये गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशां मध्ये संतापाचे वातावरण असून लहान मुले, महिला, आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.