हुआवेचे वॉच जीटी 2 लॉंच : जाणून घ्या सर्व फिचर्स

हुआवे कंपनीने वॉच जीटी 2 हे स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांना सादर केले असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांची लोकप्रियता वाढत असून अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात नवनवीन मॉडेल्स सादर करण्याचा सपाटा लावला आहे.

या अनुषंगाने हुआवे या विख्यात चीनी कंपनीने वॉच जीटी 2 हे स्मार्टवॉच भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. याचे 42 मीलीमीटर डिस्प्ले आकारमानाचे व्हेरियंट 14,990 रूपयांना उपलब्ध करण्यात आले आहे. 46 मीलीमीटर व्हेरियंट 15, 990 रूपयांना मिळणार आहे. याच व्हेरियंटमध्ये लेदर आणि मेटलचे दोन पर्याय हे अनुक्रमे 17,990 आणि 21,990 रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदी करता येतील. हे स्मार्टवॉच ग्राहकांना अमेझॉन इंडिया व फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टल्ससह क्रोमा स्टोअर्समधून खरेदी करता येतील.

वर नमूद केल्यानुसार वॉच जीटी 2 हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये लॉंच करण्यात आले असून यात अनुक्रमे 1.39 आणि 1.42 इंच आकारमानांचे डिस्प्ले दिलेले असून यावर थ्रीडी ग्लासचे आवरण आहेत. यात किरीन ए1 हा प्रोसेसर दिलेला आहे. यात एकूण 15 विविध ऍक्‍टीव्हिटीजचे मापन करण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये चालणे, धावणे, पायऱ्या चढणे, पोहणे, सायकलींग आदींचा समावेश आहे. यात हार्ट रेट मॉनिटरदेखील आहे. याच्या मदतीने हृदयाच्या ठोक्‍यांचे मापन हे अनियमितपणे झाल्यास युजरला याचा अलर्ट मिळण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात निद्रेचे मापन करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.