४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट 

ह्युवाई ही स्मार्टफोन कंपनी आपला लेटेस्ट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ७ ऑगस्ट रोजी  सादर करणार आहे. चार कॅमेरे असणाऱ्या ‘या’ स्मार्टफोनचे ‘ह्युवाई नोव्हा ३ i’ असे नामकरण करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना १००० रुपये इतकी सूट देण्यात येणार आहे.
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये २ फ्रंट फेसिंग व २ बॅक कॅमेरे देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या फोनमधील चारही कॅमेरे आर्टिफिशियल इंटीलीजेंस द्वारे सज्ज असल्याने यामधून उत्कृष्ट दर्जाचे फोटोग्राफ्स खेचले जाणार असल्याचे कंपनीने म्हंटले आहे. १२८ जी.बी. स्टोरेज क्षमता असलेल्या नोव्हा ३i ची किंमत २०,९९० एवढी आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)