नोएडा (उत्तर प्रदेश) – हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांना आज दुपारी यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात आली. त्यापूर्वी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते तोल जाऊन खाली पडलेही होते. आपल्यावर पोलिसांनी लाठीमार करून खाली पाडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
नेमकं काय झालं आणि काय घडलं ….
1)हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसला निघाले होते.
2) मात्र, यमुना एक्स्पेस हायवेववर त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला.
3) त्यानंतर राहुल आणि प्रियंका यांनी यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला.
4)पुढे एका ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
5) त्यानंतर पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली.
6) राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार ,धक्काबुक्कीमध्ये राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले.
7) घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राहुल गांधींची कॉलर पकडलेली दिसत आहे.
8) यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
9) यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं, अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
त्यानंतर या घटनेवर राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत तसेच अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.