पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. बारावीचा राज्याचा एकूण निकाल ८५.८८ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल २.५३ टक्क्याने घटला आहे. यंदाही निकालात मुलीच सरस ठरल्या असून उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा ७.८५ टक्क्यांनी अधिक आहे.
मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.२५ तर मुलांचा निकाल ८२.४० टक्के आहे. विज्ञान शाखेचा ९२.६०, कला शाखा ७६.४५, वाणिज्य ८८.२८ आणि व्यवसाय अभ्यासक्रम ७८.९३ असा निकाल लागला आहे.
राज्याच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. त्यानंतर अनुक्रमे पुणे विभाग ८७.८८, नागपूर ८२.५१, औरंगाबाद ८७.२९, मुंबई ८३.८५, कोल्हापूर ८७.१२ , अमरावती ८७.५५, नाशिक ८४.७७, लातूर८६.०८, कोकण ९३.२३ असा निकाल लागला आहे.
या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.maharashtra12.jagranjosh.com
“एसएमएस’द्वारे निकाल
बीएसएनएल नेटवर्कवरून MHHSC हा कोड व बैठक क्रमांक टाकून 57766 या क्रमांकावर पाठवूनही विद्यार्थ्यांना निकाल जाणून घेता येणार आहे.