पुणे – रेल्वेच्या एचआरएमएस विभागाचे शुक्रवारी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव यांनी उद्घाटन केले.
मानव संसाधनाच्या कामाचे संगणकीकरण करण्याच्या दृष्टीने हे यंत्रणा तयार केली असून, यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचा तपशील अद्ययावत ठेवता येणार आहे.
एचआरएमएस यंत्रणेत सेवानिवृत्ती पश्चात मानार्थ पास, पीएफ ऍडव्हान्स आणि कर्मचारी सेल्फ सर्व्हिस यासारखे नवीन मॉड्यूल्सची निर्मिती केली आहे. यामुळे मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि पेन्शनर्सना फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेचा गौरव
रेल्वे बोर्डाच्या 2019 चा कार्मिक व्यवस्थापन शिल्ड मध्य रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वेने पटकाविला आहे. मध्य रेल्वेने 14 वर्षांनंतर हे शिल्ड जिंकले. पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली यांनी संयुक्तपणे जिंकले आहे.