एकीकडे प्रेक्षक ऋतिक रोशनच्या “वॉर’नंतरच्या पुढील चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहात आहेत, तर दुसरीकडे शाहरुख खानचे चाहतेही त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. या दोघांच्याही चाहत्यांसाठी एक आनंद बातमी आहे. होय, बातमी आहे की ऋतिक रोशनचा आगामी “क्रिश 4’ची जोरदार तयारी सुरू आहे. यात शाहरुख खानही झळकणार असल्याचे समजते.
शाहरुख खान “क्रिश 4′ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ऋतिक रोशनच्या या चित्रपटाच्या ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्टची जबाबदारी शाहरुखची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटवर देण्यात आली आहे.
या चित्रपटात ऋतिक रोशनची सुपर व्हिलनसोबत जबरदस्त लढाई होणार आहे. अशा परिस्थितीत हा सुपर व्हिलन बनवण्याची जबाबदारी शाहरुख खानला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी “क्रिश-4′ मध्ये जादू परत येणार असल्याची बातमीही आहे.
दरम्यान, 2003 साली या चित्रपटाचा पहिला भाग “कोई मिल गया’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धम्माल केली होती. या चित्रपटात जादूची एक महत्वाची भूमिका होती, जी मुलांमध्येही खूप लोकप्रिय होती.