हृतिक रोशनने अलिकडेच पियानो वाजवण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुसन खानने हृतिकचा पियानो वाजवतानाचा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये सुसन खानदेखील दिसते आहे. या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण दररोज काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असणार. लॉकडाऊनच्या सातव्या दिवशी काही तरी नवीन शिकण्याचा आपला हा प्रयत्न होता, असे हृतिकने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
हल्ली मुले वेदांतू (व्हर्च्युअल लर्निंग ऍप)च्या माध्यमातून लवकर काही तरी नवीन स्कील शिकत असतात. त्याबद्दल हृतिकने समाधान व्यक्त केले आहे. आपणही पियानो वाजवणे 21 दिवसात शिकणार आहोत, असेही तो म्हणाला. दोन्ही हाताच्या अंगठ्यांचा उपयोग करणे अजून त्याला अवघड होते आहे. त्याने मस्त ट्युन वाजवली. आता सध्या एवढेच येते आहे.
पण पियानो शिकायला सुरुवात तरी झाली आहे, हे काही कमी नाही. लॉकडाऊनच्या काळात घाअतच बसून राहण्यासाठी एवढे निमित्त पुरेसे आहे, असेही त्याने सांगितले. सुसनने घर आवरायला काढले आहे. हे देखील सांगायला तो विसरला नाही. त्याच्या मागे सुसन घर आवरताना दिसतेही आहे. आपल्या फोटो आणि व्हिडीओला सौजन्स सुसन खान हिचे असल्याचेही हृतिकने सांगितले.