हॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटात होणार हृतिक रोशनची दमदार एन्ट्री

हृतिक आपल्या हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे

मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार “हृतिक रोशन’ केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या लुक आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळेच हृतिकचा चाहतावर्ग देखील त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतो.

हृतिक रोशनचा आगामी चित्रपट एका खास विषयावर आधारित आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हॉलिवूडचा असून त्यात हृतिक रोशनची एन्ट्री होणार आहे. या चित्रपटात हृतिकची भूमिकाही थोड्या वेगळ्या स्वरूपाची असणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे आणि हृतिक त्यात स्पाय ची भूमिका साकारेल अशी माहिती आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.

‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, यापूर्वी ‘टॉप फाइव्ह मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’ या यादीमध्ये हृतिकने स्थान पटकावले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.