मुंबई – बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या डान्ससाठी आणि पिळदार शरीयष्टीसाठी ओळखला जातो. सध्या हृतिक विक्रम वेधामुळे चर्चेत असला तरी आपल्या तो आपल्या लव्ह लाईफमुळे चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. हृतिक सध्या सबा आझादला डेट करत आहे. नुकतेच दोघेही मुंबईतल्या एका ठिकाणी स्पॉट झाले त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच गॉसिपिंगचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि सबा एकत्र बिल्डिंगमधून बाहेर पडतात आणि त्यांच्या कारमध्ये बसताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघेही पोज देताना दिसत आहेत. लूकबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक नेहमीप्रमाणे काळ्या रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत आहे आणि सबाने डेनिम जीन्स आणि निळा क्रॉप टॉप घातला आहे.
View this post on Instagram
हृतिक आणि सबा एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत पण सोशल मीडिया यूजर्स दोघांनाही एकत्र पाहून फारसे खूश नाहीत. सोशल मीडियावर दोघांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. या व्हडिओमध्ये दोघेही वडील आणि मुलगी वाटत असल्याच्या कमेंट युजर्सने केल्या आहेत. ठरत अनेकांनी हृतिकला आधी कुठे होतास आणि आता कुठे आलाय असा सवाल विचारला आहे.