साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील स्टार अभिनेता धनुष याने गत आठवड्यातच बॉलीवुडमधील डायरेक्टर आनंद एल राय यांच्या चित्रपटात काम करणार असल्याचे सुतोवाच केले होते. आता या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.
चित्रपट दिग्दर्शक आनंद एल राय हे धनुषला घेवून एका चित्रपटाच्या तयारीत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत रितिक रोशन आणि सारा अली खानही मुख्य भूमिका साकारणार आहेत. मात्र, अद्याप रितिक रोशन आणि साराकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण आनंद एल राय यांनी चित्रपटातील मुख्य कलाकारांची नावे निश्चित केलेली आहेत. यामुळे चित्रपटातील कास्टच्या निवडीबाबत चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झालेली आहे.
दरम्यान, आनंद एल राय यांचा गतवर्षी “झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. दुसरीकडे रितिक रोशन याचा नुकताच “सुपर 30′ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळत आहे.