मुंबई – अभिनेता ऋतिक रोशनने मुंबईतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवर दोन आलीशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत. खूप दिवसांपासून आपल्या स्वप्नातील घराची वाट पाहणाऱ्या ऋतिकनं हे घर तब्बल 97.50 कोटी रूपय देऊन खरेदी केले आहे.
माहितीनुसार ऋतिकला अनेक दिवसापासून हे घर हवे होते. आता त्याची प्रतिक्षा संपली असून त्याने हे घर घेतले आहे.
ऋतिकने जुहू-वर्सोबा लिंक रोडवर घेतलेले अपार्टमेंट हे 38 हजार स्क्वेअर फुटाचे आहेत. मन्नत बिल्डिंगच्या 14 आणि 15 व्या फ्लोअरवर हे अपार्टमेंट आहेत.
त्याने हे घर बिल्डर समीर भोजवानी यांच्याकडून 97.50 कोटी रूपयाला खरेदी केले आहे.
आतापर्यंत ऋतिक रोशन हा अक्षय कुमारच्या शेजारी राहत होता. मात्र, नवीन घर घेतल्याने तो शिफ्ट होणार असून अक्षय कुमार पासून दूर जाणार आहे.