बॉलीवूडचा चॉकलेट हिरो आणि आशियातील सर्वांत सेक्सी मॅन म्हणून गौरवला गेलेला हृतिक रोशन याने दिग्दर्शक आनंद एल. राय याच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटामध्ये सारा अली खान आणि धनुष हे मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटासाठी हृतिक आणि साराशी आनंद यांचे बोलणे झालेले होते. केवळ कॉंट्रॅक्टवर स्वाक्षऱ्या करणे बाकी होते. हृतिकने मी तुमच्यासोबत एक चित्रपट करु शकतो असे म्हटले होते. आनंद यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी होती. अर्थात हृतिकने त्यावेळी स्पष्टपणाने सांगितले होते की, मला नाही वाटत की तुम्ही अशा प्रकारच्या बातम्यांवर विश्वास ठेवावा.
जोपर्यंत मी सांगत नाही की माझा पुढील चित्रपट कोणता आहे तोपर्यंत ते अंतिम मानता येणार नाही.’ यानंतर आनंद यांनी हृतिकसोबत ची बोलणी अधिक वेगाने सुरू केली. पण आता हृतिकने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे समजते. तसेच याचे कारण सारा अली खान असल्याची चर्चाही सिनेसृष्टीत आहे.