जगभरात थैमान घालणारा करोना व्हायरस, जागतिक आरोग्य दिन व 30 मार्चला येणारा डॉक्टर डे निमित्ताने आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत पुणे व पिंपरी चिंचवड येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजाराबाबत सविस्तर माहिती घेतली जात आहे. जागतिक आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर करोना व्हायरस काय व त्याची काळजी कशी घ्यावी. याबाबत पिंपरी चिंचवड येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. परेश चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद..