मुंबई – सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात इन्स्टा रिल्स आणि युट्युब शॉर्ट्सची जबरदस्त क्रेज पाहायला मिळते. असा एकही विषय नाही ज्यावर रिल्स पाहायला मिळत नाहीत. फूड ब्लॉगिंग असो वा सिनेमाचे रिव्हूव रिल्स या जमान्यात सर्वकाही पाहायला मिळत. त्यातच कंटेन्ट क्रिएटर चांगला असेल तर विनोदाची भन्नाट केमेस्ट्री पाहायला मिळते. क्रिकेटचे मैदानही यापासून दूर राहिलेले नाही.
सध्या क्रिकेटच्या मैदानावरील असाच एक रिल्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. क्रिकेट मॅच पाहताना अनेकदा मॅच कव्हर करणारे कॅमेरामन प्रेक्षकांमधील अनेकांचे हावभाव टिपताना दिसून येतात. यामध्ये अनेकदा वेगळी विषभुषा केलेल्या मुली तसेच आपल्या टीमला चेअर करण्यासाठी तोंड रंगवून आलेल्या प्रेक्षकांचाही समावेश असतो. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुणांनी कॅमेरामॅनलाच टार्गेट करत कॉमेंट केली आहे.
क्रिकेटचा सामना कव्हर करणाऱ्या कॅमेरामनची या मुलांनी चांगलीच फिरकी घेतल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. सध्या महिला आयपील मॅचेस सुरु आहेत. त्या दरम्यानचा हा व्हिडीओ असलयाचे समजते. मॅचदरम्यान अनेकदा प्रेक्षकांमध्ये असलेल्या सुंदर मुली कॅमेरामन हेरतात म्हणून त्या स्क्रिनवर दिसतात. म्हणुणच व्हिडिओमधील काही मराठी तरुणांनी मैदानातील कॅमरामनला उद्देशून बोलल्याचे पाहायला मिळते. “पोरींना कसं कॅमेऱ्यात दाखवतो, आम्ही पोरं आहोत ना” अशी ही मूल यावेळी बोलताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. नेटकरी या व्हिडिओला भरभरून प्रेम देत शेअर करत आहेत. भर मैदानात या तरुणांनी टीव्ही स्क्रिन समोर बसलेल्या अनेकांच्या मनातील व्यथा बोलून दाखवल्यामुळे या व्हिडिओची सध्या तुफान चर्चा आहे.