निवडणूक असलेल्या राज्यांत करोना रुग्णसंख्या कमी कशी ? कोविड ‘टास्कफोर्स’ला सवाल

मुंबई – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र त्याचवेळी विधानसभा निवडणूक असलेल्या पाच राज्यात रुग्णसंख्या कमी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसनेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी थेट कोविड टास्क फोर्सलाच या संदर्भात प्रश्न विचारला आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, विधानसभा निवडणूक असलेल्या पाच राज्यात करोना रुग्णसंख्या कमी आहे. अनेक केंद्रीयमंत्री मोठमोठ्या प्रचारसभा घेत आहेत. हजारो लोक एकत्र येत आहेत. तरी तिथे कोविड रुग्णांची संख्या कमी कसकाय यावर अभ्यास करण्याच्या सूचना कोविड टास्क फोर्सला केल्याचं शेख यांनी म्हटलं.


महाराष्ट्रा व्यतिरिक्त गुजरातमध्ये देखील करोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात करोना चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे रुग्णसंख्या अधिक असल्याचं बोललं जात आहे. मात्र यामुळं राज्यात लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.