वाढत्या तापमानात पशुधन व्यवस्थापन कसे कराल ?

राज्यातील वाढते तापमान लक्षात घेता भाजीपाला पिके व फळबागांना शक्‍यतो सायंकाळी पाणी द्यावे.
नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमा रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे. तसेच फळबागांमधील बाष्पीभवन कमी होण्यासाठी पालापाचोळयांचे आच्छादन करावे व ठिबकाद्वारे पाणी द्यावे. पाण्याची कमतरता असल्यास ऊस पिकास सरी आड सरी पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

वाढत्या तापमानामुळे व ढगाळ हवामान यांचा परिणाम गोठ्यातील बाह्य कृमी विशेषत: पिसवा, गोचीड वाढण्याची संभावना आहे. त्याकरीता गोठे ाळु घ्यावे. गाभा व नुकत्याच व्हालेल्या जनावराना उन्हामध्ये चरावयास पाठवु नये. दुपारच्यावेळी जनावरे शक्‍यतो झाडाखाली बांधवीत. जनावराना मुबलक स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. संकरीत गाई व म्हशीच्या अंगावर दुपारच्यावेळी बारदान ओले करुन टाकावे. तसेच उष्णता वाढल्यास विशेषत: म्हशीना पाण्यात डुबण्यास सोडावे. शक्‍यतो दुपारच्या वेळेस हिरवा चारा खाण्यास द्यावा व वाळलेला चारा रात्रीच्या वेळेस द्यावा. कोंबड्यांचे उन्हापासून संरक्षण करणेसाठी शेडच्या बाजूने बारदान लावावे व छतावर वाळलेले गवत किंवा गव्हाच्या काड्यांचे आच्छादन करावे. मेंढ्यांचे देवी रोगापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करावे. वाढत्या तापमानामुळे गाभण जनावरे बाहेर चरावयास नेऊ नये. सहा महिन्याखालील जनावरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये. अन्यथा विषबाधा होण्याची शक्‍यता असते.

कलिंगड आणि खरबुज-सध्या कलिंगड आणि खरबुज या पिकांची लागवड चालू झालेली आहे. या पिकात प्रामुख्याने फुलकिडे, मावा व पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो व तसेच केवडा, भुरी, पानावरील ठिपके, मर आणि विषाणूजन्य रोगांमध्ये मोझॅक व बड नेक्रोसीस या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. कलिंगडाचे पीक 2 ते 3 पानावर असतानाच फवारणी करावी. प्रथमत: थायोमेथोक्‍झाम 4 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 10 मिली अधिक मॅकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारणी करावी. तसेच या पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. नाग अळी पानाच्या आत शिरुन आतील भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात. नाग अळीच्या नियंत्रणासाठी 4 टक्के निंबोळी अर्क किंवा ट्रायझोफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हात पंपाने फवारावे किंवा सदरहू फवारण्या फुले येण्यापूर्वी कराव्यात. फुले आल्यानंतर शक्‍यतो निओनिकोटीनाइड्‌स ग्रुपमधील (दा. ऍसीटामिप्रिड, इमिडाक्‍लोप्रिड व थायोमेथोक्‍झाम) सारखी औषधे फवारु नये.

मुगभुरी रोग व शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रदुर्भाव -दिसुन आल्यास बावीस्टीन 5 ग्रॅम 10 लि. पाण्यातुन फवारावे.फळ पिकेसध्या तापमानात होत असलेली वाढ लक्षात घेता, कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यास, त्वरीत पोटॅशियम नायट्रेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश 500 ग्रॅम प्रती 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जेणे करुन बाष्पोत्सर्जनामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास कमी करता येतो.

भाजीपालासध्या तापमानात वाढ दिसून येत आहे. शेडोटमध्ये भाजीपाला उत्पादन करुन ठिबको पाणी दिल्यास सध्याच्या पाणी टंचाईच्या काळातही चांगले उत्पादन मिळते. भाजीपाला पिकावरील रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 ईसी 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कोळी किटकाचा प्रादुर्भाव दिसल्यास फोप्रोपॅथ्रीन 30 ईसी 5 मिली किंवा डायकोफॉल 20 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

कांदा-फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कार्बोसल्फान 10 मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 टक्का + ट्रायझोफॉस 35 टक्के हे संयुक्त किटकनाशक 20 मिली प्रति 10 लिटर पाणी अधिक 10 मिली स्टिकर या प्रमाणात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने साध्या हात पंपाने फवारावे. करपा रोगाचे प्रमाण दिसून आल्यास त्याचे नियंत्रणासाठी मॅकोझेब किंवा क्‍लोरोथॅलोनील 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली प्रमाणे वरील किटकनाशकात मिसळून फवारणी करावी. कांदा काढणीपूर्वी 15 दिवस अगोदर पिकावर कार्बेडाझीम या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

भुईमुग- शेंगा पोखरणाऱ्या किवा पाने गुडांळणाऱ्या आळीचा प्रदुर्भाव दिसुन आल्यास कार्बारील 50% भुकटी 40 ग्रॅम किवा क्विनॉलफॉस 25 % प्रवाही 20 मिली 10 लि पाण्यातुन मिसळुन फवारणी करावी. उभ्या पिकात सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरुन काढण्याकरीता 0.5% आर्यन सल्फ़ेट व 0.2 झिंक सल्फ़ेट याची मिश्रपणे पेरणीनंतर 30, 50 व 70 दिवसांनी फवारणी करावी.

मिरची- मार्च महिन्यात फुलाची गळ होत राहते. फुलाची गळ मोठ्या प्रमाणात होत असल्यास ती थाबंविण्याकरीता एन ए ए (प्लॅनोफिक्‍स) 20 मिली प्रति 100लि पाण्यात मिसळुन फवारणी करावी, पाण्याचा ताण पडु देवु नये.
वेलवर्गीय भाजीपाला-वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या बगलफुटी काढून टाकाव्यात. वेलवर्गीय भाजीपाला पिकांना फुले येण्याच्या काळात ताण पडू देऊ नये. काकडी, कारली, दोडका, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा या वेलवर्गीय पिकांवर केवडा रोग येतो. सुडोपेरोनोस्पोरा कुबेसीस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. सुरुवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्‍यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात.

उपाय: रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यानंतर 20 दिवसांपासून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने क्‍लोरोथॅलोनील किंवा मॅकोझेब किंवा कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात साध्या हात पंपाने फवारणी करावी. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मेटॅलॅक्‍झिल एम. झेड.-72 हे बुरशीनाशक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात दर दहा दिवसांच्या अंतराने फवारावे.

भुरी: जवळ-जवळ सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये ईरीसीफी सीकोरेसीआरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग येतो. रोगाची सुरुवातच प्रथम जुन्या पानांपासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागावर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
उपाय: भुरी रोगाची लक्षणे दिसताच डिनोकॅप किंवा ट्रायडेमार्फ किंवा पॅकोनाझोल 10 मिली किंवा कार्बेडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या हात पंपाने आलटून-पालटून आवश्‍यकतेनुसार फवारण्या कराव्यात.

प्रमुख अन्वेषक,
ग्राकृमौसे, ऐएमएफयु, राहुरी तथा
प्रमुख, कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.