नवी दिल्ली : आधार कार्डचा आपल्याला अनेक कामांसाठी उपयोग होतो. ओळखपत्राशिवाय आधारची आपल्याचा इतर कामातही अनेक प्रकारे मदत होते. आता आधार पीएफ खात्याशी लिंक करून घेणे गरजेचे आहे. सरकारने आधार कार्ड तुमच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UN नंबरशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी अंतिम तारीख ३० नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत तुम्ही आधार लिकं केले नाही तर भविष्यात तुम्हाला पीएफशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही अद्याप आधार UN शी लिंक केले नसेल, तर आम्ही तुम्हाला हे करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत.
PF ला आधार लिंक करण्याची प्रक्रिया:-
पहिली पायरी
* यासाठी तुम्हाला सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जावे लागेल. आणि इथे तुम्हाला तुमचा UN नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल. या पोर्टलद्वारे तुम्ही आधारला UN शी लिंक करू शकाल.
दुसरी पायरी
* लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला वर अनेक पर्याय दिसतील, जे तुमच्या पीएफ खात्यासाठी आहेत, तुम्हाला ‘मॅनेज’ (Manage) पर्यायावर जाऊन केवायसी(KYC) पर्यायावर क्लिक करावे लागेल.
तिसरी पायरी
आता तुमच्या समोर एक पेज उघडेल, ज्यामध्ये ती कागदपत्रे तुमच्या समोर दिसतील, ज्याला तुम्ही तुमच्या पीएफ खात्याशी लिंक करू शकता. येथे तुम्हाला आधार निवडावा लागेल आणि येथे तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि सेव्ह बटणावर क्लिक करावे लागेल.
चौधी पायरी
* यानंतर तुमचा आधार UIDAI द्वारे पळताळणी केला जाईल, आणि काही वेळाने आधार कार्डच्या समोर Verify असे लिहिले जाईल, याचा अर्थ तुमचे आधार यशस्वीरित्या लिंक झाले आहे.