टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवणं कितपत योग्य?

टोमॅटो स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरली जाणारी भाजी आहे. भाज्या बनवण्यापासून ते कोशिंबीरी, सूप आणि चटणीपर्यंत हा एक मुख्य घटक आहे. परंतु फ्रिजमध्ये ठेवल्यावरही टोमॅटो खराब झाल्याच्या तक्रारी बर्‍याचदा येत असतात. उरलेला एकच प्रश्न म्हणजे टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत की बाहेर? जेणेकरून ते खराब होण्यापासून वाचू शकतील. चला तर, टोमॅटो कसे साठवावेत, हे आज जाणून घेऊयात.

टोमॅटो केवळ चवीतच नव्हे तर आरोग्यासाठीही प्रथम क्रमांकावर आहे. व्हिटॅमिन सी, लाइकोपीन, व्हिटॅमिन, पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. टोमॅटोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे टोमॅटो पिकल्यानंतरही त्याचे पोषकद्रव्य शिल्लक असते. टोमॅटोचा वापर घरात सर्वाधिक केला जातो. भाज्या, सॅलड, सूप आणि चटणी बनवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो.

टोमॅटो ताजे ठेवणे आणि बराच काळ टिकून राहणे, हे गृहिणींसाठी एक मोठे आव्हान आहे. तर टोमॅटो कसे साठवायचे ते पाहूया.

टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत किंवा नाही यावर बरेच संशोधन चालू आहे. टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपण टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यास ते वेगाने मऊ होऊन खराब होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यातील जीवनसत्त्वे जसे की व्हिटॅमिन सी आणि इतर खनिजे कमी होतात. फ्रीजमधील थंडपणामुळे त्याची चव, रंग आणि गंध देखील बदलतात.

आपल्याकडे जास्त टोमॅटो असल्यास, ते गोठवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रथम टोमॅटो उकळणे आणि सोलणे आणि नंतर त्यांना एअर टाइट बॅगमध्ये साठवणे. हवे असल्यास आपण प्युरी बनवून फ्रिजमध्ये ठेवू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.