आज-काल चॅट करण्यासाठी यूजर्स सर्वाधिक वापर व्हाॅटसअॅपचा करतात. तुम्ही सुध्दा व्हाॅटसअॅप वापरत असाल. तुमच्या फ्रेंडलिस्टमध्येे असे काही काॅन्टेक्ट असतील, ज्याच्याशी तुम्ही सीक्रेट चॅट करत असाल आणि हे चॅट इतरापासून लपवू ईच्छिता. यासाठी आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पर्सनल चॅट विना डिलीट लपवू (Hide) शकता.
अॅन्ड्राइड यूजर्ससाठी…
1) सर्वात आधी व्हाॅटसअॅप ओपन करा.
2) त्यानंतर जे चॅट तुम्हाला लपवायचे आहे, त्यावर थोड्यावेळापर्यंत प्रेस करा.
3) तुम्हाला वरच्या बाजूला आर्काइव (Archived) आॅप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
4)त्यानंतर तुमचे पर्सनल चॅट पू्र्णपणे लपविले (Hide) जाईल.
आयफोन यूजर्ससाठी…
1) डिव्हाईसमध्ये व्हाॅटसअॅप ओपन करा.
2) आता जे चॅटिग तुम्ही लपवू इच्छिता, त्यास डावीकडे स्लाइड करा
3) त्यानंतर तुम्हाला आर्काइव (Archived) आॅप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
4) क्लिक केल्यास तुमचे पर्सनल चॅट लपविले (Hide) जाईल.
लपविलेले(Hide)चॅट असे आणा परत…
1) लवविलेले चॅट परत आणण्यासाठी व्हाॅटसअॅप ओपन करा
2) त्यानंतर चॅट स्क्रिनच्या सर्वात खालच्या बाजूला जा.
3) येथे तुम्हाला आर्काइव (Archived) आॅप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा
4) आर्काइव (Archived) या आॅप्शनवर लाॅन्ग प्रेस करा आणि अन्आर्काइववर क्लिक करा.
5) अशाप्रकारे तुमेच लपविलेले चॅट परत येईल.
व्हाॅटसअॅपमध्ये लवकरच येणार क्यूआर (QR) कोड फिचर…
व्हाॅटसअॅपच्या यूजर्सला क्यूआर कोड मिळणार आहे. कंपनी अॅन्ड्राइड आणि आयओएसच्या बीटा व्हर्जनवर क्यूआर कोड सर्पोटींगचे टेस्टिंग करत आहे, त्यानंतर यूजर्स नवीन यूजर्सचा क्यूआर कोड स्कॅन करून त्याचा नंबर सेव्ह करू शकणार. दरम्यान, हे फिचर कधी येणार याबाबत कंपनीने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.