वयात आलेल्या मुलांमध्ये एक विलक्षण बदल पाहायला मिळतो. या बदलामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात चिडचिड, राग, मत्सर, वैताग अशा भावना निर्माण होतात. अशावेळी समुपदेशन, त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींसमवेत पालकांचीही भुमिका ही फारच महत्त्वाची असते. यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
बदलती तरूणपिढी
सध्याच्या तरूण पिढीच्या गरजा, महत्त्वाकांक्षा या झपाट्याने बदलत आहेत. त्यातून आजकालची बदलती जीवनशैली, त्याचसोबत कामाचे प्रेशर, बदलते नातेसंबंध, स्पर्धा आजच्या पिढीपुढील आव्हानं ही अधिक आहेत. पालकांना आपल्या वयात येणाऱ्या मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.
आजूबाजूची परिस्थिती
आजकाल या सर्व आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीमुळे तरूणांमध्ये राग, चिडचिडेपणाही वाढला आहे. त्याचा परिणाम केवळ त्यांच्यावरच होत नाही तर सोबतच आजूबाजूच्या मंडळींवरही होतो. यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. याचा फटाका आईवडिलांसोबतच्या नात्यावरही होताना दिसतो. त्यामुळे अशावेळी पालकांची भुमिकाही महत्त्वाची ठरते.
मानसिक आरोग्य
अशा या आव्हानांना समोरे जाण्यासाठी शरीरासोबतच तरूणांनी आपले मानसिक आरोग्यही नीट जपणे आवश्यक आहे. अशावेळी त्यांना पालकांच्या सहकार्याची मोठी मदत होऊ शकते. अनेकदा कामाचे टेंशन, राग, मन:स्ताप ते घरी पालकांसमोर काढतात परंतु त्यांना होणारा त्रास हे मनमोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत.
टेंशन दूर करा
पालकांनी मुलांशी विविध विषयांवर किंवा त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा माराव्यात. त्यांच्या या मोकळेपणाने मुलं नक्कीच टेंशन फ्री होऊ शकतात. त्यांना नक्कीच याचे समाधान वाटेल. मुलं ही जास्त चिडचिडी होत असतील तर त्यांना शांत करण्यासाठी असे फंडे नक्कीच कामी येतील. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आल्यास त्यांचा चिडचिडेपणाही नक्कीच कमी होण्यात मदत होईल.