इस्लामाबाद – चीन हा पाकिस्तानसाठीचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे. चीनकडून पाकिस्तानला आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जात असते. पाकिस्तानला चीनकडून जवळपास २९ अब्ज डॉलरचे कर्ज दिले गेले आहे.
सौदी अरेबिया हा पाकिस्तानसाठी दुसऱ्या क्रमांकाचा देणगीदार आहे. सौदीकडून पाकिस्तानला ९.१६ अब्ज डॉलरचे कर्जदिले गेले आहे, असे वर्ल्ड बँकेच्या अहवालात म्हटले आहे. जागतिक बँकेचा आंतरराष्ट्रीय कर्ज अहवाल २०२४ मंगळवारी प्रसिद्ध झाला. त्यात ही माहीती देण्यात आली आहे.
मात्र आता चीनकडून मिळणाऱ्या कर्जात घट होऊ लागली आहे. २०२३ मधील २५ टक्के कर्जाच्या तुलनेत आता २३ टक्के कर्ज दिले गेले आहे. तर सौदी अरेबियाच्या कर्जाचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढून ७ टक्के इतके झाले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून सर्वात जास्त कर्ज घेणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान जवळपास पहिल्या तिघांमध्ये आहे.