Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी घोषित केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेने विधानसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर मनसेने 7 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनसेने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत दोन महिला उमेदवारांनाही संधी देण्यात आली आहे.
संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर
मनसेने जाहीर केलेल्या यादीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून संगिता चेंदवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संगिता चेंदवणकर या मनसेच्या बदलापूर महिला आघाडीच्या प्रमुख आहेत.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/gmBAIzsfRb
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2024
बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यावेळी बदलापूरकरांनी केलेल्या जनआंदोलनचे नतेृत्व संगिता चेंदवणकर यांनी केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. पण संगिता चेंदवणकर यांच्या पुढाकारामुळे गुन्हा दाखल झाला होता.
मयुरी बाळासाहेब म्हस्के यांना उमेदवारी जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेवराई विधानसभा मतदारसंघातून मयुरी बाळासाहेब म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, मनसेने काल जाहीर केलेल्या 45 उमेदवारांच्या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंच्या सदा सरवणकरांचं आव्हान असेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र माहीममधून अद्याप उमेदवार जाहीर केला नाही.
मनसेने पुण्यातील ३ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार, माजी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश यांना खडकवासला मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे. तर, पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हडपसरमधून आणि माजी नगरसेवक किशोर शिंदे कोथरूडमधून लढतील.