मुंबई : मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोपांची मालिका काही केल्या संपत नाही. त्यातच आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पुन्हा एकदा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी क्रांतीने ट्वीट करत दोन फोटो ट्वीट केले आहेत. हे फोटो समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्टॉरंट अँड बारचे आहेत.
Image 1. The said ‘BAR’ . Image no.2 the Sadguru family restaurant and bar. Once again Farziwada. How much to expose these people. Sitting at such responsible positions and behaving like this 🙄 just to tarnish Sameer Wankhede’s name. pic.twitter.com/iSplpocuml
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) November 20, 2021
पहिल्या फोटोत नवाब मलिकांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्यात क्रांतीने या बारबाबत तिची माहिती दिली आहे. तसेच नवाब मलिक यांच्यावर ‘फर्जीवाडा’ हा त्यांचाच शब्द वापरून हल्ला चढवला आहे.
क्रांती रेडकर म्हणाली, “पहिल्या फोटोत बारचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्टॉरंट अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा’”. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा. जबाबदार पदावर बसून हे असं वागत आहेत. हे केवळ समीर वानखेडे यांचं नाव खराब करण्यासाठी सुरू आहे.”
Sameer Dawood Wankhede का एक और है यह फर्जीवाड़ा केंद्र pic.twitter.com/IUR2LtMeWZ
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधला. “समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केला होता.