मुंबई – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतले असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. या कारवाईचा अभिनेत्री कंगना राणावतने निषेध केला आहे.
अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा प्रकाश जावडेकर यांनी केला निषेध
Message for Maharashtra government @republic #Arnab #ArnabWeAreWithYou #ArnabGoswami pic.twitter.com/AJizRCitS7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 4, 2020
तिने म्हटलं आहे की, “मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? ” असं ट्विट करत कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून आक्षेपार्ह उल्लेख केले आहेत.