किती नेत्यांची मुले सैन्य दलात भरती होतात?

कन्हैय्या कुमारने केली अमित शाह यांच्यावर टीका

रायपूर : छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हिडमा नावाचा नक्षलवादी कमांडर असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत.

यातच जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणाची अमित शाह यांनी पाहणी केली. तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर कम्युनिष्ट पक्षाचा नेते कन्हैय्या कुमार यांनीही तीव्र संताप व्यक्त करत प्रश्न विचारला आहे.

कन्हैय्या कुमार यांनी ट्विट केले आहे की,ज्यांच्या घरातील मुलगा शहीद झालाय, त्या कुटुंबीयांचे अश्रू पाहिल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजकारणामध्ये गृहमंत्री यांचा मुलगा बीसीसीआयचा सचिव होतो, जनतेने सत्ताधाऱ्यांना विचारायला हवेच की, किती नेत्यांची मुले सैन्य दलात भरती होतात? भ्याड नक्षली हल्ल्यात देशातील सर्वसामान्य लोकांचा रक्त सांडतं अन्‌ खुर्चीवर असलेले याचा फायदा घेत असतात. देशातील जनतेला हे कटकारस्थान समजायला हवं. देशातील वीर जवानांना आणि शेतकऱ्यांना नमन ! असे ट्विट कन्हैय्या कुमारने अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, अमित शहा हल्ल्याच्या ठिकाणी पाहून केली. त्यावेळी बोलताना, जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्‍चित होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला होता. जवानांचं सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. ताकदीने लढू आणि जिंकून दा नक्षलवादी हल्ल्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.