शरीराला किती तास झोपेची गरज आहे? बातमी नक्की वाचा

पुणे – पुरेशी झोप न होणे आणि झोपेच्या वेळा निश्‍चित नसणे ही गोष्ट आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम करत असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला हवा, पाणी आणि अन्न यांची गरज असते त्याप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही गरजेची असते. चांगली झोप मिळाल्याने केवळ शरीरालाच नाही तर मेंदूलाही आराम मिळतो.

 झोपेच्या अनियमिततेचे अनेक प्रकार आहेत…

१) पहिला प्रकार म्हणजे ‘कमी झोप’ घेणे. आपण जितकी झोप कमी घेऊ तेवढा दिवसातला जास्त वेळ कामासाठी वापरता येईल म्हणून लोक कमीत कमी झोप घेण्याचा प्रयत्न  करतात. मात्र कमी झोप घेण्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही, कार्यक्षमता निर्माण होत नाही. त्यामुळे तुमच्या रोजच्या कामावर देखील मोठा परिणाम होतो.

२) पूर्वी आठ तास झोप आणि सोळा तास काम असे कोष्टक होते. म्हणजे दोन तास कामांसाठी एक तास झोप घेतली जात होती. मात्र, आता लोक सहा तास झोप घेत आहेत आणि १८ तास काम करत आहेत. म्हणजेच काम आणि विश्रांती यांचे गुणोत्तर दीड पटीने वाढले आहे.

३) सुदृढ व्यक्‍तीला 6 ते 8 तास झोप गरजेची असते. झोपण्याची-उठण्याची योग्य वेळ निश्‍चित करावी.
झोपण्याचं ठिकाण शांत असावं. तसंच काही जणांना खोलीत लाईट लावायची आवड असते त्या दिव्याचा प्रकाश हलका असावा. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.