तुमच्या खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत? (भाग-१)

तुम्ही स्वतःचा पोर्टफोलिओ मॅनेज करत असाल तर तुमच्या खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत? आता विविधता (डायव्हर्सिफिकेशन) म्हणता म्हणता तुमच्या खात्यात बऱ्याच कंपन्या दाखल झाल्या असतील तर प्रत्येक कंपनीचा अभ्यास करणे आणि ट्रॅक ठेवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे का?

गुंतवणूकदारांच्या खात्यांच्या एका अभ्यासात असे दिसून आले की, त्या अभ्यासातील खात्यांच्या एकूण संख्येपैकी दहा टक्के डिमॅट खात्यांमध्ये पन्नासपेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर आहेत. त्यातील काही खात्यात तर ही संख्या शंभरच्या वर गेलेली होती. हे सगळेच एका अर्थाने धक्कादायक आणि चकीत करणारे होते. खात्यात पन्नासपेक्षा जास्त कंपन्यांची उपस्थिती हा खरोखरच मोठा आकडा आहे. अगदी म्युच्युअल फंड मॅनेजर्सच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या योजनांमध्येदेखील हाताबाहेर जाईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविधता नसते.

एखाद्या गुंतवणूकदाराच्या खात्यात इतक्या कंपन्यांचे शेअर असणे याचाच अर्थ त्याने पुरेसा अभ्यास न करता शेअरची खरेदी केलेली आहे. असे बहुतेक गुंतवणूकदार ढोबळ आणि कानोकानी मिळालेल्या माहितीवरून बहुतेक वेळा स्मॉल कॅप आणि छोट्या मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. कोणतेही सबळ कारण नसताना या कंपन्यांच्या शेअरची किंमत वाढू लागलेली असते आणि अशावेळी गुंतवणूकदाराला कथित टिप मिळते आणि त्याने त्या कंपनीचे शेअर घेतलेले असतात. अनेकदा लार्जकॅप कंपन्यातही अशाच प्रकारे गुंतवणूक झालेली असते. त्यामुळे एकंदरीत कंपन्यांची संख्या वाढत गेलेली असते आणि त्यातून बाहेर केव्हा पडायचे याचे कोणतेच उद्दीष्ट नसल्याने अनेक कंपन्यांमध्ये फार हालचाल नसली तरी शेअर पडून असतात.

तुमच्या खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत? (भाग-२)

मग एखाद्याच्या खात्यात किती कंपन्यांचे शेअर असावेत?  अर्थात याचे उत्तर आकड्यात देता येणे कठीण आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराची समज, आकलन, अभ्यास, जोखिम घेण्याची क्षमता, उद्दीष्ट, गुंतवणुकीचे विश्लेषण करण्याची  अशा अनेक गोष्टींवर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून असते.

– चतुर

Leave A Reply

Your email address will not be published.