…तर मग सीबीडी ऑईल ऑनलाइन कसे उपलब्ध ?

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे. चौकशीदरम्यान एनसीबीच्या हाती ड्रग्ज  रॅकेटमध्ये आणखी काही बॉलिवूडकर सामील असल्याबाबतचे पुरावे लागले आहेत. याच पुराव्यांच्या आधारे आता एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी ऑनलाइन सीबीडी ऑईल मागवल्याची कबुली जयाने दिली. यावर आता अभिनेत्री मीरा चोपडाने ट्विट करत प्रश्न विचारला आहे.

काय म्हणाली मीरा चोपडा

‘सीबीडी ऑईल हे बेकायदेशीर आहे तर मग ते सहजपणे ऑनलाइन कसे उपलब्ध आहे? मी ऑनलाइन चेक केले. जर ते बेकायदेशीर आहे तर त्याच्या संबंधीत काही नियम का नाहीत?’ या आशयाचे ट्विट तिने केले आहे. तिच्या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.जेव्हा सीबीडी ऑईल ऑनलाईन उपलब्ध आहेत तर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.