पावसाचे गणित मांडतात तरी कसे?

मृग नक्षत्रापासून पावसाळा सुरू झाला की, ठिकठिकाणांहून मुसळधार पावसाच्या, बंधारे-धरणे भरल्याच्या आणि धरणांतून पाणी सोडण्याच्या बातम्या येत असतात. कुठे किती आणि कसा पाऊस झाला, त्याच्याही बातम्या येत राहतात. अनेकदा हा पाऊस मिलीमीटर्समध्ये, सेंटीमीटरमध्ये अथवा इंचात मोजला गेल्याचे पहायला मिळते. पाऊस अशा विचित्र युनिटमध्ये कसा काय मोजतात, याचेही कुतूहल वाचकांना असते. शिवाय धरणातून सोडलेल्या पाण्याबाबतही आज एक हजार क्‍युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात आले,’ असे संदर्भ दिसतात, वाचायला मिळतात. काय आहेत या संज्ञांमागील गणिते? पाऊस का मोजतात मिलीमीटरमध्ये आणि काय अर्थ आहे क्‍युसेकचा? पाहूया…

एक टीएमसी पाणी म्हणजे काय?
1 फूट द 1 फूट द 1 फूट म्हणजे 1 घनफूट पाणी
1 घनफूट म्हणजे 28.31 लिटर्स पाणी
28.31 लिटर्स पाणी म्हणजे अंदाजे दोन बादल्या पाणी
1 दशलक्ष घनफूट (1एमसीएफटी) म्हणजे 10,00,000 घनफूट पाणी
1,000 दशलक्ष घनफूट म्हणजे 1 टीएमसी पाणी (एक अब्ज घनफूट पाणी)
धरणसाठ्यातील पाणीसाठा टीएमसीमध्ये मोजला जातो. महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जात असलेल्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी (105 अब्ज घनफूट पाणी) इतकी मोठी आहे.

क्‍युसेक म्हणजे काय?
धरणातून पाणी सोडताना पाण्याचे प्रमाण क्‍युसेकमध्ये मोजले जाते. एक घनफूट प्रती सेकंद म्हणजेच एक क्‍युब पर सेकंद याचा अर्थ क्‍युसेक असा होतो. आता वर आपण पाहिले की, एक घनफूट पाणी म्हणजे 28.31 लिटर्स पाणी. ज्यावेळी खडवासला धरणातून 1000 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो, त्यावेळी 1000 28.31 असे 28,310 लिटर्स पाणी प्रती सेकंदाला नदीपात्रात सोडले जाते. कोणत्याही धरणातून जर 24 तासात सतत 11,500 क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर त्या धरणाची पातळी 24 तासांनंतर 1 टीएमसीने कमी झालेली असते.

क्‍युमेक म्हणजे काय?
क्‍युसेकमध्ये पाणी घनफूटामध्ये मोजले जाते. तर क्‍युमेकमध्ये पाणी घनमीटर्समध्ये मोजले जाते. एक क्‍युमेक पाणी म्हणजे प्रतीसेकंद 1000 लिटर्स पाणी. म्हणजेच 1000 क्‍युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल, तर 1000 1000 असे 10 लाख लिटर्स पाणी प्रतीसेकंद या वेगाने नदीपात्रात येत असते.

पूर रेषा कशा आखतात?
पांढरी रेषा –
एखाद्या धरणातून 30,000 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा व्हाईट लाईन’ अथवा पांढरी रेषा’ म्हणून ओळखली जाते. हा सरवसामान्य पूर मानला जातो.

निळी रेषा –
20-25 वर्षांतून एखाद्या वेळेस नदीचे पात्र पांढरी रेषा ओलांडते. ज्यावेळी धरणातून 60,000 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा ब्लू लाईन’ अथवा निळी रेषा’ म्हणून ओळखली जाते.

लाल रेषा –
40-50 वर्षांत अतीवृष्टीने नदीचे पात्र निळी रेषाही ओलांडते. ज्यावेळी धरणातून 1,00,000 क्‍युसेक वेगाने पाणी सोडले असता, त्या नदीपात्राची पाणीपातळी जेथे पोहोचेल, ती रेषा रेड लाईन’ अथवा लाल रेषा’ म्हणून ओळखली जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.