“लाखो लोक रोज मरतायत अशा वातावरणात मी लग्न कसं करू?”; ‘या’ अभिनेत्रीने विवाह सोहळा ढकलला पुढे

मुंबई : ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील वैशाली टक्करचा गेल्या महिन्यात रोका झाला होता. या महिन्यात ती डॉ. अभिनंदन सिंग हुंडलसोबत लग्न करणार अशी अपेक्षा होती. मात्र अभिनेत्रीने देशात सुरु असणाऱ्या कोरोनाच्या तांडवांचा विचार करून तिने तिचे लग्न पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘सध्याचे परिस्थिती पाहता मी माझे लग्न पुढे ढकलले आहे. मी अशा वातावरणात लग्न कसे करु शकते, जेव्हा लोक दररोज मरत आहेत, ते अस्वस्थ आहेत. यावर्षी मला नवं आयुष्य सुरू करावंस वाटत नाही आहे. यावर्षी माझे लग्न होणार नाही. सध्या भारत सर्वाधिक प्रभावित आहे आणि मी उत्सव, लग्न किंवा देशाबाहेर जाण्याच्या मूडमध्ये नाही. माझ्या देशात, जेव्हा आजूबाजूचे लोक पीडित आहेत आणि मरत आहेत, तेव्हा हे पाऊल उचलणे मला योग्य वाटत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पुढे येत मदतीचा हात दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.