अभियंत्यांनी केली पोलीस ठाण्यात तक्रार
येरवडा – येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात विकास कामात कसा भ्रष्टाचार होतो ही संभाषनाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, हा आवाज आपला नसून मी व नगरसेवक, कार्यकर्ते यांना बदनामी करणारे संभाषण सोशल मीडियावर टाकले असून तशी लेखी तक्रार कनिष्ठ अभियंता यांनी येरवडा पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता व सामाजिक कार्यकर्ता यांच्या मधील संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
याविषयी बोलताना कनिष्ठ अभियंता म्हणतात की, तथा कथीत सामाजिक कार्यकर्ते हे आपल्याला काही दिवसांपासून एका प्रकरणात ब्लॅक मेल करत होते. त्याचा नगरसेवक व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. यामुळे त्यांनी मला स्वतःला, नगरसेवक व कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून आपण त्या सामाजिक कार्यकर्त्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.