मुंबई – आज बहीण-भावाचं नातं आणखी दृढ करणारा राखीपौर्णिमेचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ आहे. भारतात बहुतेक सर्वत्र राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. हिंदू, जैन आणि काही शिख धर्मियही हा सण आनंदाने साजरा करतात. मात्र, अश्यातच बॉलिवूड अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’च्या बहिणींवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.
बहीण भावाच्या दिर्घायुष्यसाठी प्रार्थना करते आणि भाऊ आयुष्यभर आपल्या बहिणींला तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. पण सुशांतच्या बहिणींकडे आज तो हात नाही, ज्याला ती राखी बांधू शकेल. रक्षाबंधन निमित्त सुशांतच्या बहिणीने आपल्या लाडक्या भावासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सुशांतची बहिणी म्हणाली, “गुलशन, मेरा बच्चा आज 35 वर्षांनंतर असा दिवस आपल्या आयुष्यात आला आहे. तुला ओवाळण्यासाठी आरतीचं ताट तयार आहे, त्यामध्ये दिवा देखील आहे, पण आरती करण्यासाठी तो चेहरा नाही. मिठाई आहे पण तोंड गोड करण्यासाठी तू नाहीस, कधीही विचार केला नव्हता की आपल्या आयुष्यात असा दिवस येईल. तुझ्याकडून खूप काही शिकली आहे. आता तुझ्या शिवाय एकटी कशी नव्या गोष्टी शिकू… अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुशांतने 14 जून रोजी आपल्या मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून या आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. सुशांतच्या फॅन्स च्या मते ही आत्महत्या नसून इंडस्ट्री मधील लोकांच्या दबावाखाली येऊन झालेला खून आहे असे म्हंटले जातेय. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. आत्तापर्यंत 30 हून अधिक लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे.