प्रशांत परिचारकचे निलंबन मागे घेण्याचा सभापतींचा निर्णय निंदनीय ? – धनंजय मुंडे

मुंबई: देशात युद्धजन्य परिस्थिती असताना, संपूर्ण देश सैनिकांच्या पाठिशी उभा असताना सैनिकांच्या पत्नीबाबत अभद्र वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारकचे निलंबन मागे घेण्याचा सभापतींचा निर्णय निंदनीय आहे. हा सैनिकांचा अपमान आहे. सभापतींच्या या निर्णयाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

सत्ताधारी पक्षाचे आमदार सभापतींवर दबाव टाकत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. देशात युद्धजन्य परिस्थिती असताना, संपूर्ण देश सैनिकांच्या पाठिशी उभा असताना सैनिकांच्या पत्नीबाबत अभद्र वक्तव्य करणाऱ्या परिचारकचं निलंबन मागे घेऊच कसे शकतात?

देशहितासाठी आम्ही एकत्र येत आहोत तर दुसरीकडे भाजप राजकीय कार्यक्रम टाळायला तयार नाहीत. सीमेवर देशाचे सैनिक लढत असताना पंतप्रधान मात्र मेरा बुथ सबसे मजबूत नावाचे कार्यक्रम घेत आहेत. यातून पंतप्रधानांचा दुटप्पीपणा दिसत आहे. यांच्यासाठी मतं आणि निवडणुकाच महत्वच्या आहेत.

https://www.facebook.com/DPMunde/videos/788494134852284/

Leave A Reply

Your email address will not be published.