मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी कारण ठरणार आहे ते म्हणजे भाजप कार्यालया समोरचे वादग्रस्त पोस्टर.
मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयासमोर मध्यरात्री काही अज्ञातांनी आक्षेपार्ह पोस्टर लावले आहेत. ही पोस्टर नेमके कोणी लावले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. या पोस्टवर आशिष शेलार यांच्या फोटोचे विडंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय, एका गाण्याचे विडंबन करण्यात आले आहे.
“कसं काय शेलार बरं हाय का?” असे विचारत, “काल तुम्ही किशोरी ताईंचा अपमान केला म्हणे,” असे विचारत शेलार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे. भाजप कार्यालयासमोरच थेट अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.