T20 World Cup 2021 : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

दुबई: भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.

भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानच्या किंवा जगातील कोणत्याही टीम विरोधात खेळताना पूर्ण क्षमतेनं आणि विश्वासानं सामोरं जातो. आम्ही पाकिस्तानच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली असून मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष असेल, असं विराट कोहली म्हणाला.

आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांनी कितीवेळा पराभूत केलं याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतोय. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल, असं विराट कोहली म्हणाला.

टी – 20 विश्वचषकातील टीम इंडियाचा पाकिस्तान विरोधातील सामना रविवारी (24 ऑक्टोबर) दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल.सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

टीम इंडियाचा टी 20 विश्वचषक 2021 पाकिस्तान विरोधातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील. या मॅचचे ऑनलाईन लाॉईव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाईन पाहू शकता

संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रउफ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.