Houthi attack on America । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांवर मोठ्या प्रमाणात लष्करी हल्ले केले. ज्यात किमान ३२ जणांचा मृत्यू झाला. लाल समुद्रातील बाब अल-मंदब सामुद्रधुनीमध्ये आंतरराष्ट्रीय नौवहनाचे संरक्षण करण्याच्या येमेनच्या दाव्याचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. हुथींनी या हल्ल्यांना “युद्ध गुन्हे” म्हणून वर्णन केले आहे आणि योग्य प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
हुथींचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल-सलाम यांनी अमेरिकेचे दावे खोटे असल्याचे सांगत,”हे हल्ले आंतरराष्ट्रीय मतांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न” असल्याचे म्हटले. बाब अल-मंदब सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय शिपिंगवर त्याचा परिणाम होत असल्याचे नाकारले. त्यांनी असा दावा केला की, येमेनने जाहीर केलेली सागरी नाकेबंदी केवळ इस्रायली नौदलाच्या जहाजांपुरती मर्यादित आहे. ती गाझामधील लोकांना मानवतावादी मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने आहे.
अमेरिकेने चार हवाई हल्ले केले Houthi attack on America ।
येमेनची राजधानी साना याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी, “शुआब जिल्ह्यातील पूर्व जेराफ भागात किमान चार हवाई हल्ले झाले, ज्यामुळे परिसरातील महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. एका स्थानिक माणसाने या हल्ल्याबद्दल , “स्फोट खूप शक्तिशाली होते, ते भूकंपासारखे होते.” असे म्हटले.
तर पुढे बोलताना त्यांनी,”आक्रमणाला निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल” असे हुथी बंडखोरांचे म्हणणे आहे आणि “आमचे येमेनी सशस्त्र दल कोणत्याही तणावाच्या वाढीला प्रतिसाद देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.” अमेरिकन हल्ल्यात सुमारे २३ लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढू शकतो.
येमेनवर हल्ला, इराणला इशारा Houthi attack on America ।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही हुथींचा मुख्य समर्थक असलेल्या इराणला कडक इशारा देत या गटाला तात्काळ पाठिंबा देणे थांबवण्यास सांगितले. अमेरिकेला कोणत्याही प्रकारच्या धोक्याचे गंभीर परिणाम होतील, असे ते म्हणाले. “अमेरिका तुम्हाला पूर्णपणे जबाबदार धरेल आणि आम्ही हे हलक्यात घेणार नाही,” ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी त्यांच्या सत्य सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “सर्व हौथी दहशतवाद्यांना, तुमचा वेळ संपला आहे आणि तुम्ही आजच हल्ला करणे थांबवावे. जर त्यांनी तसे केले नाही, तर तुमच्यावर असा नरक कोसळेल जो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल!”
येमेनचे हुथी बंडखोर लाल समुद्रात का हल्ले करत आहेत?
नोव्हेंबर २०२३ पासून, हुथींनी आंतरराष्ट्रीय शिपिंगवर १०० हून अधिक हल्ले केले आहेत, ज्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम झाला आहे. गाझामधील इस्रायल-हमास युद्धामुळे पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ हे हल्ले केले जात असल्याचे हुथींचे म्हणणे आहे. या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, अमेरिकन सैन्याला क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्यासाठी महागड्या कारवाया कराव्या लागल्या आहेत.
मात्र , यापूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अणुकरारावर त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला होता, कारण त्यांनी म्हटले होते की अमेरिकेसोबत करार केल्याने अधिक विश्वासघात होईल आणि देशावर दबाव वाढेल. उदाहरणार्थ, ट्रम्प इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दरम्यान, त्यांनी येमेनमध्येही हल्ला केला आहे. आता ट्रम्प यांचे पुढचे पाऊल काय आहे हे पाहणे बाकी आहे.