गरिबांनाच नकोय “हक्‍काचा निवारा’

आवास योजनेतील घरांसाठी पुणेकरांचा नकार

 

पुणे – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात स्वत:चे घर नसलेल्या नागरिकांना हक्‍काचे घर मिळावे या उद्देशाने महापालिकेकडून पाच ठिकाणी 3 हजार घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी काढलेल्या लॉटरीमधील केवळ 240 जणांनीच 10 टक्‍के रक्‍कम भरली, तर 1500 जणांनी रक्‍कम भरण्यासाठीचे चलन घेतले आहे.

दरम्यान, ही रक्‍कम भरण्याची येत्या सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रशासनाकडून येत्या शनिवारी आणि रविवारी चलन घेऊन जाण्यासाठी पालिकेचे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे.

आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडे तब्बल 1 लाखांहून अधिक अर्ज आले असून जवळपास 30 हजार जण पात्र ठरले आहेत. त्यातील, पहिल्या 2 हजार 918 घरांसाठी 24 ऑक्‍टोबर रोजी महापालिकेकडून ऑनलाइन सोडत काढण्यात आली.

हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन भागांत 5 ठिकाणी ही घरे असणार आहेत. या लॉटरीनुसार, प्रत्येकाला महापालिकेने त्यांना घराची लॉटरी लागल्याची माहिती आतापर्यंत पाच ते सहावेळा कळविली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.