Housefull 5 : ‘हाउसफुल 5’च्या संपूर्ण स्टारकास्टचे फोटो समोर; ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज

Housefull 5 | साजिद नाडियाडवालाच्या ‘हाउसफुल’ फ्रँचायजीच्या पाचव्या भागाबाबत सर्वांनाच फार उत्सुकता लागली आहे. ‘हाऊसफुल 5’ आता शूटिंगच्या शेवटच्या शेड्यूलमध्ये प्रवेश करत आहे. निर्मात्यांनी X वर एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. यासह स्टारकास्टचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील पाच भागांपर्यंत पोहोचणारा हा पहिला चित्रपट फ्रँचायजी आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रणजित, सौंदर्या शर्मा, निकितीन धीर यांसारख्या कलाकारांचा सहभाग आहे. ‘हाउसफुल 5’चे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले असून चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. Housefull 5 |
Cruising through the last schedule of our cinematic journey! ⛵️5️⃣🌊#SajidNadiadwala’s #Housefull5
Directed by @Tarunmansukhani@akshaykumar @Riteishd @juniorbachchan @FardeenFKhan @Asli_Jacqueline #SonamBajwa @NargisFakhri @duttsanjay @bindasbhidu @nanagpatekar @IChitrangda… pic.twitter.com/Et0dk82GIi— Nadiadwala Grandson (@NGEMovies) November 27, 2024
हाऊसफुल्ल या चित्रपटाचे वेगवेगळे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक कायमच आतुरतेने वाट पाहत असतात. या आधीच्या सर्व हाऊसफुल्ल चित्रपटाच्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल्ल’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका घातला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर 2012 मध्ये ‘हाऊसफुल्ल 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 2016 मध्ये ‘हाऊसफुल्ल 3’ आणि 2019 मध्ये ‘हाऊसफुल्ल 4’ हे सिनेमाही प्रदर्शित झाला. त्यानंतर आता ‘हाऊसफुल्ल 5’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहे. Housefull 5 |
हेही वाचा:





